परिचयाचे मला वावडे ,आपला परिचय नेमका काय असतो ?
आपलं स्वतःबाबतचं मत की इतरांनी ठरवलेली मते ,मला महात्मा गांधींचं एक Quote या संदर्भात अतिशय महत्वाचं वाटतं ,
Nature has so made us that we do not see our backs,it is reserved for others to see them.
आणि कुठेतरी झोर्बा चं वाक्यं मागावर असतंच ,
You have everything except madness.
या संभ्रमात परिचय राहूनच जातोय . तो असाच कुठेतरी वाटेत सापडेल .सूरात ,तालात ,रंगात ,शब्दात ,निरभ्र आभाळात नाहीतर पावसाच्या लकेरीत . प्रवासाची सुरुवात तर होऊ द्या …।